STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Tragedy

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy

अर्थ नाही

अर्थ नाही

1 min
319

ती विव्हळत असते, ती किंचाळत असते

ती मदतीचा हात मागत असते

तो मात्र उघड्या डोळ्यांनी

तिचा आक्रोश पाहत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही


ती विरोध करत असते,

ती धडपडत असते

हात जोडून विनवणी करत असते

तो मात्र तिच्यावर चाल करुन तिला चिरडत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही


बेशुद्ध अवस्थेतून ती शुद्धीवर येत असते

समाजाकडे पाठ फिरवून शून्यातून नव्याने उभी राहत असते

तो मात्र तिच्याच चारित्र्याचे वाभाडे काढत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही


ती लढत असते,

हरूनही पुन्हा जिंकत असते

नव्या क्षितीजात यशाची भरारी घेत असते

तो मात्र कुत्सिततेने तिचे पाय खेचत असतो

अशा मर्दानगीला अर्थ नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy