अर्थ नाही
अर्थ नाही
अर्थ नाही तुमच्या या वागण्याला
सतत बाहेर पडण्याला
कुठलेच नियम न पाळणे
इतके का अंगवळणी पडले
देशाला अडचणीत टाकणे
इतके का स्वस्त झाले
पोलिसांनी, सैनिकांनी मात्र देशभक्ती दाखवायची
कधी सीमेवर तर कधी रस्तावर...
आता या लढाईत सेवा देणारेही उतरले
आम्ही मात्र घरात कसे रहायचे नाही याचे बहाणे शोधले
अर्थ आहे का काही खरंच या गोष्टींना
15 ऑगस्ट, 26 जानेवारीलाच देश प्रेम दाखवण्याला
अर्थ आहे का काही तुमच्या या विचारांना
