STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

पाणी ना...

पाणी ना...

1 min
194

तुला पाहताच प्रश्न पडे मी माझ्याशीच लढे 

तुझी ती आठवण माझ्यासाठी झाली जुनी ना....


शब्दात तुझ्या गोडवा म्हणू नको रागात तू गाडवा 

माझ्यासाठी सखे तुझी का मंजुळ वाणी ना....


स्वतःला तू समजतेस काय माझे अजून जमिनीवर पाय 

तू कधी कोणाला प्रेमाचं चाखवलं लोणी ना.....


जगावेगळ्या तुझ्या बाता माझ्या आठवणीत राता

तुझ्या प्रेमाच्या समुद्राचं खारट पाणी ना.....


संगम तुझ्यात झाला वेडा रोज रात्री घालतेस तू राडा 

तू कधी माझ्या प्रेमाची केली पाहणी ना......


देशी दारूसारखी तुझ्यात नशा माझी तूच आशा 

आतापर्यंत सुरू झाली प्रेमाची कहाणी ना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy