भाकर
भाकर
परत गावात मारला तू फेरा गं
सात दिवसांनी पाहिला तुझा चेहरा गं
काही कळेना मिळेना एक वेळची भाकर.....
हाताला घट्टे पडले शेतात काम करून
हाती काही लागेना दिवस-रात्र घाम गाळून
नाही धन दौलत मी आहे एक चाकर.....
वाटे मला सखे माझीच इतकी लाज
दु:ख खूप कळेना मला तुझ्या प्रेमाचा साज
माझीच सारी स्वप्नं बनली आहेत नोकर....
