परकी झाले
परकी झाले
ह्या जगाला परकी का झाले
फक्त दोष हा की मी मुलगी आहे
मुलगा झाला की आनंद होतो सर्वांना
का... तर तो वंश चालवेल म्हणुनी?
सर्व त्रास मुलीच्या जातीला का?
डोळ्यातले पाणी थांबत नाही माझ्या
जगाला मी नको का ग आई?
तुझ्या श्र्वसातली मी आहे ना ग
उदरात तुझ्या मला प्रेम मिळालं
उदरात असताना यातना मी तुझ्या पहिल्या
ह्या यातना सहन करताना हुंदका तुझा मी पाहिला
तो हुंदका अजूनही लक्षात आहे ग माझ्या
मुलगी म्हणुनी जगानी मला हिणवलं... !
का मुलगी म्हणुनी अडचण होते ह्या जगाला
मी जरी बोलत नसले तर माझं मन दगड नाही ग
जगाने घाव खूप दिले मनावर माझ्या
कशी शांत होऊ तूच सांग ना
अग मला बाहेर येऊ दे ना ग
लढा देईल मी प्रत्येकाला
नको संपवू उदरात मला तुझ्या
येऊ दे ग मला ह्या धरतीवर
