माणसांच्या जंगलात
माणसांच्या जंगलात
माणसांच्या जंगलात
सुखद वारा झुलावा,
जसे वाटे एक हात
पाठीवरून फिरावा...
माणसांच्या जंगलात
घायाळ नयनी पाणी,
जसे वाटे एक हात
अश्रू पुसण्यासाठी फिरावा...
माणसांच्या जंगलात
व्याकुळ वेदनेने हरावा ,
जसे वाटे एक हात ममतेचा
हृदयाशी बिलगुन धरावा...
माणसांच्या जंगलात
श्वासात जगण्याचा
ऑक्सिजन भरावा,
जसे एक हात चिरंतर
आठवणीत खेळत राहावा...
