STORYMIRROR

Nisha Thore

Tragedy

3  

Nisha Thore

Tragedy

प्रवास अर्ध्या वाटेतला

प्रवास अर्ध्या वाटेतला

1 min
256

प्रवास अर्ध्या वाटेतला 

सुरू होण्या आधीच संपलेला.. 

कोण्या एका वळणावर

आपसुक थांबलेला.. 


हीच भीती असते मनात 

आवडीचा प्रवास संपण्याची.. 

साथ सोडून जाताना

बंध मायेचा तुटण्याची.. 


प्रवासात या तुझ्या भेटतील 

बरेच थांबे अन् प्रवासी.. 

मनात डोकावून बघशील कधी 

सापडेल मैत्रीचा गाव आभासी.. 


नव्हत माहित आभासी गावात

मैत्रीतल प्रेम की प्रेमातली मैत्री.. 

सोडून कधीच जाणार नाही

इतकीच वाटायची खात्री.. 


जिथे मन अपेक्षा करत

तिथेच होतो अपेक्षाभंग.. 

सुंदर मनाच्या नात्यामध्ये मग 

तिथेच पडतो दुभंग..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy