STORYMIRROR

Nisha Thore

Others

3  

Nisha Thore

Others

कळत नकळत..

कळत नकळत..

1 min
249

कळत नकळत 

सारं काही घडून जातं..

मिळवता मिळवता 

सारं काही हरवून जातं..


कळत नकळत

मनाच्या धुंदीत

सूर गवसल्या सारखे वाटते..

सूर जुळवता जुळवता

गीत नवे उमटते..


कळत नकळत

जून्या आठवणी

मनी घर करू लागतात

जणु डोळ्यातून मेघ ओथंबतात..


कळत नकळत 

असंच एक वादळ येत

आयुष्याला ग्रहण लागतं..

सर्व असताना नसल्यासारखं वाटतं


सोबत्यांच्या घोळक्यांत 

मन मात्र एकट असतं

एकांतात उगीचच सैरभैर होतं


सारं काही 

कळत नकळत


Rate this content
Log in