STORYMIRROR

Nisha Thore

Romance

3  

Nisha Thore

Romance

चहा

चहा

1 min
623

आठवतो का रे तुला

तो कॉलेज कट्टा, सुगंधी चहा

अन रंगलेल्या त्या अविरत गप्पा..

किती छान होता ना!!

सोनेरी क्षणांचा तो टप्पा..


पावसाची रिमझिम अन

टपरीवरचा चहा, बाईकवरून रपेट..

किती छान होती न!!

पहिली आपली भेट..


आठवतं मला

तुझ्यासोबतचा चहा तर

एक निमित्त असायचं

तुझ्या डोळ्यात मला 

निमित्तानं पाहणं व्हायचं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance