STORYMIRROR

Smita Murali

Tragedy Inspirational

3  

Smita Murali

Tragedy Inspirational

एक कविता तुझ्यासाठी

एक कविता तुझ्यासाठी

1 min
858


एक कविता तुझ्यासाठी


देशप्रेमाने भारावलेली तुझी छाती

शत्रूसामना करण्यासाठी शस्त्र हाती

सीमेवर राहून जपतो नि जगतोस नाती

हे शूर सैनिका एक कविता तुझ्यासाठी


गर्भात वाढवतेस पोटचा गोळा नऊ मास

देशसेवेचा संस्कार करतेस मुलावर खास

काळजापासून दूर ठेवतेस तुझा जणू श्वास

हे जवानांच्या माते एक कविता तुझ्यासाठी 


अनेक स्वप्ने पित्याने जपली जरी उराशी

नाळ जोडली पुत्राची देशाच्या सेवेशी

अशी दिव्य त्याग मुर्ती तू जगी असशी

हे जवानांच्या पित्या एक कविता तुझ्यासाठी


कुंकू आपल्या भाळावरचे सौभाग्यलेणे

देशसेवेत पतीची साथ ठावे तुला देणे

विरहाचेही आवडीने तू गातेस कसे गाणे

हे जवानाची पत्नी एक कविता तुझ्यासाठी 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy