STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy Inspirational

शहिदांना नमन

शहिदांना नमन

1 min
562

 शहीदांना नमन


भारताच्या स्वातंत्र्यासाठी

ज्यांनी दिली प्राणाची आहुती

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू

यांच्या विचाराने झाली क्रांती


व्यक्ती मरत असतो पण त्याचे

विचार कधी ही मरत नाही

हेच शिकवण मिळते आम्हांला

शहिदांना आम्ही विस्मरत नाही


इंग्रजांच्या जुलमी राजवटीला

अनेकांनी केला होता विरोध

अनेकांना दिल्या त्यांनी यातना

इंग्रजांना आला जेंव्हा क्रोध


भारत भू च्या रक्षणासाठी

मागेपुढे कोणी पाहिले नाही

देशासाठी ते तिघे झाले शहीद

स्वार्थी विचार कधी केला नाही


वंदन करतो त्या वीर सपुतांना 

जे देशासाठी झाले अजरामर

आठवण करूनी त्यांच्या कार्यांना

जिवंत ठेवू स्वातंत्र्यलढ्याचा समर



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy