STORYMIRROR

गीता केदारे

Tragedy

3  

गीता केदारे

Tragedy

व्यसनाधीनता...

व्यसनाधीनता...

1 min
647


व्यसनाधीनता... 


व्यसनांच्या अधीन जाऊन

करू नये घरदार बरबाद

दारूच्या नशेत अडकून 

 शरीराचीच लागते विल्हेवाट... 

 

नशेत धुंद होऊन 

गटारीत लोळण घेतात 

तणावाच्या सबबी देऊन 

बाटलीवर बाटली ढोसतात... 


पिणाऱ्यांना नशेचं फक्त 

निमित्त हवं असतं 

पार्ट्यांच्या नावाखाली 

दारू पिणं होत असतं... 


होत असतो हळूहळू 

शरीरावर दारुचा परिणाम 

नाही उरत माणूस माणसात 

"दारुड्या" म्हणून होतात बदनाम 


म्हणूनच दैवकृपेने मिळालेल्या 

देहसंपत्तीला जपावे 

सर्व प्रकारच्या व्यसनांपासून 

कायम अबाधित ठेवावे... 

... © सौ. गीता विश्वास केदारे... 

       मुंबई 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy