हरवली माणुसकी
हरवली माणुसकी
हरवली माणुसकी
जग सारे उजाडले
टाहो फोडते धरणी
सौख्य कुठे हरवले
क्रांती, प्रगती, उन्नती
श्रेय सारे विज्ञानाचे
सुखी जीवनाचा मंत्र
बंध तिथे समतेचे
प्रेम, स्नेह बंधुभाव
हर्ष रुपी मांगल्याचे
जिनवाणी अनमोल
दिव्यसार जीवनाचे
करा रक्षण धरेचे
सोने जीवनाचे व्हावे
विश्व अवघे सुंदर
पुन्हा बहरून यावे
हरवली माणुसकी
जग उजाडले सारे
सौख्य जागवा मनात
नभी जसे चंद्र तारे
