एक होती इर्शालवाडी
एक होती इर्शालवाडी
होत्याचे नव्हते झाले इर्शालवाडीचे
एन रात्रीत जीव गुदमरले गोरगरिबांचे,
दिवसभर कष्ट करून ही माणसं शांत
सह्याद्रीच्या कुशीमध्ये साखर झोपेत,
स्वप्नांची चादर अंगावर पांघरून
लहान थोर देवाच्या घरी गेले सोडून,
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे संसार
दरड आणि माती कोसळून हरवले घरदार,
जीव तळमळला असेल प्राण जाताना
ईश्वरा तू कुठे होतास डोंगर कोसळताना,
आज तलीये गावाची ती दुर्घटना
देवा कशाला करतो रे पुन्हा पुन्हा,
डोळ्यातल्या कडा दाटल्या अश्रूंनी
बातमी समोर येताच हृदय आले भरुनी,
नको देऊ असे कोणाला मरणयातना
भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माझ्या बांधवांना.
