अपघात
अपघात
सातव्या महिन्यातील अपघाताने जन्म
जन्मजात उजव्या पायाने अपंग
चार वर्षाचा होई तोवर
एका अक्षर बोलला नाही कोणा संग
सातवीत खोकल्याचे झाले निमित्त
दाखवले डॉक्टरांना तेव्हा कळले अपघाताने
हृदयाच्या एका झडपेला आहे सूज
ऐकून हे वडील पुरते खचले आघाताने
रोजच्या मग गोळ्या झाल्या चालू
पंधरावड्याला इंजेक्शनचा डोस असे
दम लागत होता चालताना, पळताना
मुलाबरोबर वडिलांची परवड दिसे
दहावीत असताना मुलगा
वडील परलोकी गेले
अपघाताने कुटुंबच काय तर
गावही परके झाले
चुलते, नातेवाईकांच्या साथीने
गावातील लोकही होते मदतीला
मुलाचे ऑपरेशन झाले हृदयाचे
जीव लावणारे होते अवती भवतीला
गोळ्यांच्या रोजच्या माऱ्याने
दिवस चालले होते छान
कसेबसे लग्न असे ठरले
मुलगी मिळाली जशी सुपारी संग पान
संसाराचा गाडा ओढताना
एक कन्यारत्न जन्मा आले
अपघाताने डॉक्टरच्या चुकीने
मुलीच्या एका डोळ्याचे नुकसान झाले
संसार गाडा चालूच होता
एका मुलाचा मग जन्म झाला
दुःखी झालेल्या घरात
परत एकदा आनंद आला
अपघातांची माळ काही संपत नव्हती
मग पॅरएलइसएस चा स्वतः अटॅक आला
त्याच काळात आई सुद्धा गेली
असा हा परत अपघात झाला
जीवन असे नशिबाच्या दिशेने
जसे जाईल तसे चालले आहे
भगवंताची कृपाच म्हणायची
पुढील एखाद्या अपघाताची वाट पाहत आहे
अजून एखाद्या अपघाताची वाट पाहत आहे...
