#शोध
#शोध
कुठे, कसा त्या निखळ आनंदाचा शोध घ्यावा
आठवणी त्या येतील परतुनी जाता गावा
अंगणी खेळताना नसे पडण्याची भीती
सावरण्या सदैव असती एकमेकांसोबती
झोपताना दिसे चंद्र तार्यांचे नभांगण
झुलवत जसे करी निद्रेच्या स्वाधीन
आरवणे देई चाहूल सूर्य उगवण्याची
ऐकायलाही नसे घंटा घड्याळ्याच्या गजराची
होते सगळे आनंदी, स्वच्छंदी, समाधानी
ह्या आनंदाला मुकलोय सर्व काही असूनही
प्रा.सौ. नलिनी लावरे
