STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy Others

4  

Mrs. Mangla Borkar

Tragedy Others

शहर आणि कविता

शहर आणि कविता

1 min
16


एक कविता असते

आणि

एक शहर असतं


शहराला दिसत नाही काहीही

दिसत नाही, ऐकू येत नाही

जाणवत नाही वा नाही घेता येत

वास शहराला .. कशाचाच !

कविता

शहराच्या खिजगणतीलाही नाही ..

दिपवून टाकणारा झगझगाट

कर्कश्य किंवा दबलेले सततचे आवाज

दुर्गंधी किंवा कॉंक्रीटचं आणि

डांबराचं अंगावर चढलेलं सोरायसिस ..

या कशानेही शहर बधत नाही

वाढत राहाते ..


हे शहर वाढेल तितकी कविता खुंटणार आहे ..


कवितेला सर्वकाही दिसतं जाणवतं

खुपतं टुभतं सलतं ..

कारण जाणिवांनी - जाणिवांमधून कविता येते

ती सगळं पाहू शकते, ऐकू शकते

जाणिवांत साठवत असते

श्वासांत वेचत बसते

म्हणूनच कविता अपंग ठरते ..

या अनिर्बंध, अमर्याद वाढत जाणार्‍या

प्रबळ शहरापुढे !

          


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy