STORYMIRROR

Suyash Bhanwase

Tragedy

4  

Suyash Bhanwase

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
9

दुष्काळ (कविता)


काळ्या काळ्या मातीला या पावसाची आस // 

करपल्या जिवालाही जगण्याचा ध्यास //धृ//


न्हात्या धुत्या झाल्या पोरी, रिकामीच ओटी 

छावणीत हंबरती गायी, उपाशीच पोटी

छावणीच झालीमाय, दुरावल्या शिवारास //१//


शिवार फिरून टिपं गाळी, चिमणी गं बाई 

ना उरला दाणा कसला अन् कुठली लाही

उजाड झालं खळं ना भरली कुठं रास //२//


वाडीवस्ती ओस इथं अन् बागडणारी तान्ही 

मुकी झाली वाणी आवाज ना येई कानी 

ताटात ना उरली गोडी, बोचणारा घास //३//


चुलीत लाकडे जळून खाक झाली क्षणी

 भुईतही या ना उरले रं पाणी 

पोटामंधी धग अन् करपलेला श्वास //४//


उन्हाच्या झळा अन् उजाड हे शिवार

पेंगाळली वासरे ही दावणीला फार

ढुसण्या देऊन चिटती, आटलेली कास //५//


भेगाळली धरणी माय, पोळणारे पाय

काळवंडलं जगणं त्याला दुष्काळाची हाय

रापणारी कातडी तिला, करपणारा वास //६//


                  नवनाथ भानवसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy