कळी
कळी
हिरवा पदर जरीचा लेवून
मोत्यांची माळ त्यास लावून
ओठ गुलाबी दावून.....
हळूच डोकावून..
पहा, ती अशी लाजेल-लाजेल
नववधूच जणू ती
कोमल स्पर्शांनी फुलेल.....
अलगद झुलणारी..
नववधू ती नव्हाळी...
गुलाब पुष्पांच्या निखळ वातावरणी
शोभून दिसते तरूणी......
पहा पहा, 'तीच ती'
तीच ती
"उमलती कळी"....

