वेदना
वेदना
प्रेम मला माहित नव्हतं
प्रेम करायला तू शिकवलं
मग मन प्रेमानं भरलं
तनामनातून प्रेम फुलत राहीलं
हसवी- फसवी तू
प्रेमात मी पडलो होतो
नंतर नाही गाठ भेट
तुझ्यासाठी रडत होतो
नंतर तुला पाहिलं तेव्हा
आपली प्रेमज्योत संपली होती
इतिहास संपला होता
ओळख मात्र राहिली होती
आपलं प्रेम मुकं होतं
ते अर्ध्यावर थांबलं होतं
कारण तुझ्या गळ्यात
मी मंगळसूत्र पाहिलं होतं
याचीच वेदना अंतरी
सतत सलत होती
जीवापाड प्रेमाची या
सांगता मात्र झाली होती
