कोपरा
कोपरा


दुःखांच्या गावाला मी गेलो वतीने कुणाच्या...
झालो ठिय्या स्वप्नांचा मी संमतीने कुणाच्या!
माझ्या नाण्याने नाही केला निवाडा कुणाचा
छापा आला वा काटा खोट्या नितीने कुणाच्या!
चंद्राने सांभाळावी ती वर्तुळे भोवताली ...
डोळ्यांखाली का यावे त्या आकृतीने कुणाच्या?
पैशाचा झाला पैसा प्रीतीस ठोकून टाळे
व्यव्हारी झाली होती ती सोबतीने कुणाच्या!
स्वप्नांच्या काचे मध्ये तो एकटा कोपरा मी ...
आनंदाने नाचावे मी संगतीने कुणाच्या..