पाऊस आल्यावर.....*
पाऊस आल्यावर.....*
*पाऊस आल्यावर.....*
किती काळीज हळहळते सखी पाऊस आल्यावर
तुझ्या विरहात मन रडते सखी पाऊस आल्यावर
कसा मी सावरू आता तुझ्याविन तोल माझा मी
गडे पाऊल गडबडते सखी पाऊस आल्यावर
भडकते आग हृदयाची कशी पाण्यात भिजतांना
हवेने अंग थरथरते सखी पाऊस आल्यावर
मृगाच्या पावसासोबत जुळे माझी तुझी प्रीती
अचानक वीज कडकडते सखी पाऊस आल्यावर
निरोपाच्या सरी घेऊन मी पाऊस पाठवतो
तुझी मज आठवण छळते सखी पाऊस आल्यावर
विसरलो मी तुला राणी विसरलो सर्व काही पण
मला ती भेट आठवते सखी पाऊस आल्यावर
पंकजकुमार उत्तम ठोंबरे
कोंडोली ता.मानोरा वाशिम

