Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

VINAYAK PATIL

Tragedy

3  

VINAYAK PATIL

Tragedy

पावसाचे रौद्र रूप

पावसाचे रौद्र रूप

1 min
321


असहाय्य मन भिते

पावसाच्या या रूपाला

टाळसी कसे मानवा

निसर्गाच्या या कोपाला ||१|| 


भर दुपारी आला तो

सारं गेलं अंधारून 

झोपडीतून पाहिले

गेलो थोडा हादरून ||२|| 


कोसळण्यावर त्याने 

खरंच केलीया मात 

मनी उठले काहूर

कसा तू करशी घात ||३|| 


नाही थांबला अजून

पावसाचा असा जोर 

धरणे भरल्या भीती

लागला जीवाला घोर ||४|| 


महापुराची ही चित्रे 

डोळ्यांपुढे सरकली

प्रलयाच्या जाणिवेने

उरी धडकी भरली ||५|| 


मन माझं सांगतय

हे ही संकट टळेल 

जिवंत आहोत आम्ही 

उद्या सकाळी कळेल ||६||  


Rate this content
Log in