STORYMIRROR

Vimal Patkari

Tragedy

3  

Vimal Patkari

Tragedy

लहरी गोड आठवणींच्या !!

लहरी गोड आठवणींच्या !!

1 min
207

कळी ना हसे पवन प्रकाशाविना 

तैसे ऋक्ष जीवन एकटेपणात !!


मनी स्वप्नसागर सुरेख सजवला

भरतीनं तो जणू हर्षीत झाला

ओहोटीनं जणू तो शांतची झाला !!


दोन जिवांचे मिलन गोड मधुर झाले

संसारी जणू नंदनवन बहरले

कालांतराने ओसाड वाळवंट झाले!!


सूर्या ग्रहण असे काळ आवसेला 

चंद्रा ग्रहण ते शुभ्र पौर्णिमेला 

यम ग्रहणांनी साथी नेला काळ पहाटेला!!


धरती आसुसे नील अंबरासाठी 

सागर सरितांच्या होती भेटीगाठी 

दोन जिवलगांची झाली ताटातुटी!!


जिथं तिथं साजन आठवे मनी 

मधुर स्मृती विसराया मन ना जुमानी

जीवनसागर पार करिते स्मरुन गोड आठवण लहरी !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy