पण कधी भेटलाच नाही......
पण कधी भेटलाच नाही......
डोळे शोधत होते देव
पण देव कधी भेटलाच नाही.
म्हणता माणसात पहावा देव
पण मानूस कधी भेटलाच नाही.
चढवला मुखवटा चेहर्यावर
की खरा चेहरा दिसलाच नाही.
चेहर्यामागे चेहरा लपलेला
आरशातही तो गवसला नाही.
आहे स्वार्थी जग हे
येथे नि:स्वार्थी भेटलाच नाही.
गुंतलेला जो तो आपल्या विचारत
आपला आसा कोणी भेटलाच नाही.
जे वाटत होत भेटावं
ते कधी भेटलाच नाही.
जे वाटत होत झिडकराव
ते कधी सुटलाच नाही.
