STORYMIRROR

Pandit Warade

Romance Tragedy Others

3  

Pandit Warade

Romance Tragedy Others

ही तगमग जीवघेणी

ही तगमग जीवघेणी

1 min
166

ही तगमग जीवघेणी, तळमळतो जीव हा राया ।

विरहाच्या अग्नीत पोळते, सखया माझी काया ।।धृ।।


फिरतांना नदीच्या काठी नजरेला नजर मिळाली

त्या आम्रवृक्षाच्या खाली भेट तुझी नि माझी झाली

पण ऐन मिलनाच्या वेळी, कुणी शत्रू येई हुसकाया

विरहाच्या अग्नीत पोळते, सखया माझी काया ।।१।।


अशी कशी विचित्र दुनिया, प्रेमाचे मूल्य ना कळते

दिसताच प्रीतीचा खेळ, का उगाच मनात जळते

ताटातूट प्रेमी जीवांची, करतात का तडफडाया

विरहाच्या अग्नीत पोळते, सखया माझी काया ।।२।।


गुजगोष्टी प्रीतीच्या दिसता, द्वेषाने पेटून उठती

बिनसता जरासे काही,अंतरात उकळ्या फुटती

कुठे गेली आपुलकी अन् ओसरली ममता माया

विरहाच्या अग्नीत पोळते, सखया माझी काया ।।३।।


आपलेही तसेच घडले, जरा सूर प्रीतीचे झडले

मन शत्रूचे का दुखावले, दगडाचे फटके पडले

घाव एक वर्मी बसला, अन् निपचित पडला राया

विरहाच्या अग्नीत पोळते, सखया माझी काया ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance