STORYMIRROR

Pratibha Vibhute

Tragedy Others

4  

Pratibha Vibhute

Tragedy Others

नका करू आम्हास पोरके

नका करू आम्हास पोरके

1 min
448

नऊ महिने ओझे वागवूण

साहू अनंत प्रसव कळा 

तुझे कोमल मुख पाहताच

सर्व यातना दूर झाल्या बाळा...१!


तुझ्या बाललीला पाहतांना

 धन्य वाटे मज आईपण

तुझे संगोपन करताना होई

जीवनाचे सदैव रे रण...२!

 

आनंदले तुज वाढवताना

होता म्हातारपणची काठी

 तुज घडवताना रात्रंदिन

यश मिळवण्यास होते पाठी...३!


घेतलीस उंच उंच भरारी

यश लोळण घेई पायी

नाव,शिक्षण,संपत्ती मिळता

परदेशी जाण्याची तुज घाई....४!


उर समाधानाने भरले माझे,   

आनंद गगनात ही मावेना

 बाळ परदेशी जाणे काही

आईच्या मनाला भावेना....५!


समजावून सांगे बाळास

जाऊ नकोस असा रे दूर

नको करू आम्हास पोरके

आईच्या अश्रुला येई पूर...६!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy