STORYMIRROR

sobati soundade

Tragedy Others

4  

sobati soundade

Tragedy Others

आई

आई

1 min
491

मोळी होती डोईवर 

पाय सलसल त्या उन्हाला 

चार भली मोठी ठिगळ तिच्या

फाटक्या साडीला 

कष्टाती कष्ट झिरपली काया

जमिनीपरी हॄदयाला मोठाल्या 

भेगा..

अजूूनही ती रानातच त्या शांत 

तिन्हीसांजेला, उमटतील रक्ताची 

पावलं जेेव्हा बोचेेल काटा 

तिच्या भेगाळलेल्या टाचेला 

दुःःखाच्या या मनामध्ये 

चूक मानेल त्या आशेेला 

ना नसेल थारा डोळ्यातल्या आसवांना 

कधी आवरेेल हा तिचा संसाराचा पसारा 

अजूनही देतीये ती आपल्या आयुष्या पहारा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy