नियम आयुष्याचे
नियम आयुष्याचे
माया असावी आभाळाएवढी
दुःख असावं अळवावरचेे
असली जरी स्वाभीमानी मान
तरी गुण असावे लव्हाळाचे
खोटं नसावी मनामध्ये निर्मळ मदत करताना
निस्वार्थाचा स्वर दाटो अंबराला साद घालताना
आयुुष्याच्या शेेतावरती
कुंंपण मनुजाचे नीट घाल
साखरझोपेत असताना ,ना
कुंंपणच शेत खाऊन लोटेल
काळ
वेध घ्यावा भविष्याचा
टाकून कोडे भूतकाळाचे
मनगटावर नशीबा ठरत, नकोच संग पुराण शास्राचे
छाताडाला ढाल करावी, कर बनतील तलवार
फुंंकून रणशिंंग आयुष्याचे युद्धाला करावी सुरूवात
हिरे,पाचू, माणिक, मोती पायाशी येवून बिलगतील
जेव्हा जरतारी यशाची शाल पूर्ण अंगी पांघरली
गर्व असेल वैभवाचा
ना लागेेल समाधा झोप
जेव्हा मखमली शैैयेत निजशील
