संकल्प
संकल्प
निरभ्र आकाशात पाहताना
चमकणाऱ्या ताऱ्याची चित्र मनात
रेखाटायची
शुभ्र मनाच्या रस्त्यावरती भिती कुठल्या अमावस्येची
निवडावा रस्ता धुक्याधुक्याचा खाचखळग्यांचा
अन्
पसरलेल्या काट्यांचा
शोधताना वाट धुक्यांतुनी
मग हे काटेच वाढवतील वेग पायांंचा
नजर
जावूनी थेट क्षितीजाला भिडावी
स्पर्शूनी येवू अंबराला ही जिद्द नव्या
संकल्पनेची
