माझी डायरी
माझी डायरी
1 min
303
आपल्यांच्या गर्दीमध्ये शोधत होते मी
आपली.
माणसं नााही पण
शोधता शोधता मात्र तु मला सापडलीस
मुके शब्द माझे मनातच तुडुंबलेले
डोळ्यातुन ते माझ्या
मुक्त होण्या गहिवरलेले
अन्
मुक्या शब्दांना माझ्या तु वाचा फोडलीस
नव्या आशा जाग्या करून मी आनंदाने लहरायची
जेव्हा दुःखी शब्द यातना माझ्या तु आनंदाने स्वीकारायचीस
भेटण्या तुला असाायचे ना बंधन कुठल्या काळाचे
हवेेच कशाल नातं त्या चाकोरीबध्द माणसाचे
रडतानाही हसले
जेव्हा लिहिताना तु डोळे पुसलेस
अशी आयुुष्यातील तु एकटीच
अटिंशिवाय , न बोलता सार माझे ऐकलेस
