Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

आठवतं का ग तुला ते सारं काही ?

आठवतं का ग तुला ते सारं काही ?

1 min
288

आठवतं का ग तुला ते सारं काही ?

कुठे कशी आपुली भेट झाली 

तू झाली होतीस कावरी - बावरी 

मी ही होतो थोडासा घाबरलेलो 

आठवतं का ग तुला ते आजही 

नजरेस नजर भिडता डोळ्यात 

एकमेकांना न्याहाळताना 

खूप काही घडलं होत कळत नकळत 

आठवतं का ग तुला ते आजही 

तू रडवेली होऊन म्हणाली होतीस 

येते रे मी,निघायला हवं आता माझा

मार्ग वेगळा सांभाळ स्वतःला 

आठवतं का ग तुला ते आजही 

लक्ख सूर्य प्रकाशा इतकं स्वच्छ 

गोठले होते शब्दच ओठी माझे 

शिळा बनुनी मी उभा तसाच 

आठवतं का ग तुला ते आजही 

डोळ्यानीच खूप काही बोलून गेलीस 

भावूक तू होऊन शब्दांच्या पलीकडले 

पाठमोरी होत दिसेनासी झालीस ती कायमचीच 

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy