इवलीशी पणती
इवलीशी पणती
मी इवलीशी पणती
भावना व्यक्त करते
दाटूनी आलया हृदय
मन मोकळे बोलते..
तुम्ही रं माझेच सर्व
मला सर्वच समान
भेदभाव नाही मुळी
असुद्यावे नित्य भान..
देव्हाऱ्यात मी जळते
तुळसीपाशी जळते
अनेक प्रसंगी जळते
तुमच्यासाठी गळते..
मीच श्रद्धास्वरूप
मीच प्रेरणास्वरूप
मीच आत्मस्वरूप
मी परमात्मस्वरूप..
मला तुम्ही विसरले
श्रद्धा स्थान संपले
काळ ओघी वाहूनी
मार्ग तुम्ही भरकटले..
मी असेन इवलीशी
गहन माझी महत्ती
चराचर प्रेरक शक्ती
प्रकाश हेतू उत्पत्ती..
