प्रवास तुझा माझा
प्रवास तुझा माझा
तुझ्या माझ्या प्रेमाची सुरवात पावसाच्या सरींबरोबर झाली
कधी तू तर कधी मी एकमेकांना सावरत संसाराची सुरवात केली
मला काय हवं काय नको ते सतत जातीने बघितलंस,
सावलीसारखा माझ्या बरोबर राहिलास कधी एकटं नाही सोडलस
एकदा उशीर मला झाला तेव्हा तू लहान मुलासारखा रडलास
मी लांब गेल्याच स्वप्नात पाहताच मिठी मारून बसलास.
नशीबवानच मी जाणू अस सर्वाना सांगत होते
देवाचे मी खूप खूप आभार मानत होते
पुस्तकांच्या पानासारख आयुष्याच पान उलटलं
आता मात्र आपल्यामध्ये फक्त व्यवहाराचं नातं उरलं.
