शेतकरी- कविता
शेतकरी- कविता
हे शेतकरी राजा
अशी कोणती तुला सजा
वाईट जीवाची ही दशा
नाही उमेदीची आशा
माझ्या राजा रे ,शेतकरी राजा रे
शेतकरी म्हणून गुणगान तुझे
तुटपुंज्या शेतीवर जगण्याचे ओझे
आनंदाचे जीवन नाही नित्य तुझे मरण
निसर्गाचा कोप होतो दुष्काळात जगण
माझ्या राजा रे ,शेतकरी राजा रे
हातचे पीक जाते , जगने झाले रे कठोर
गुरेढोरे पान्यावाचून मरती धरतीवर
धरती माता मोकलून रडे वर्षा म्होर
वाचव माझी लेकरे सारा भार तुझ्यावर
माझ्या राजा रे ,शेतकरी राजा रे
ठोस जगन्याला होऊ दे उपाय
सोई साऱ्या तुला मिळतच राहो
एकदा तुझ्या डोळ्यात आनंद दिसू दे
हाष्य नव्या आशेचे चेहऱ्यावर फुलू दे
माझ्या राजा रे , शेतकरी राजा रे
तुला दुनिये सारखी नाही आता हाव
तुझ्या मालाला मिळावा योग्य भाव
तुझ्या कष्टाला मिळावा आता न्याय
तुझ्या जगन्यात अर्थ नवा रहाय
माझ्या राजा रे, शेतकरी राजा रे
सुखी संपन्न व्हावे सर्व गाव
तुझ्या जगण्याचे मोल आता व्हाव
पुढच्या पिढीसाठी अविस्मरणीय दिसाव
तुझ्या शेतात परिवर्तन होत रहाव
माझ्या राजा रे, शेतकरी राजा रे
