कबूल करते...
कबूल करते...
कबूल करावे लागले ....
आज मागे वळुनी पाहता
क्षण अपुरेसे का वाटले
जागल्या त्या श्वासात ही
अजुनी काहीसे उणे जाणले
एकल्या सांजेस सोबती
स्वत:च एकली भेटले
उरल्या काही आठवणी
मनात घर करुनी राहिले
आज क्षितिजाच्या साथीने
मनातही काहुर माजले
क्षण मिटल्या स्वप्नातल्या
परतुनी भास खरे जाहले
उणिवाची जाणिवांशी जुळली
त्या एक वेदनाने च जागले
क्षण तिथेच होते थांबलेले
आज कबूल करावे लागले ....