STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance Tragedy Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance Tragedy Others

वाट पाहीन मी

वाट पाहीन मी

1 min
182

अजून किती ही वेळ वाट मी पाहीन

कित्येक वर्षे सरले आहेत भेटी गाठी होऊन 

तू माझ्या आज हृदयी स्मरणात आहेस अजून

अजून किती ही वेळ वाट मी पाहीन

माझी ईच्छा आहे की घे एकदा भेटून

तुझे माझ्यावर किती तरी प्रेम होते 

असे काही तरी होईल कल्पनेत ही नव्हते

मात्र तुझ्या बोलण्यात नि वागण्यात 

प्रेमाची झलक दिसली मला चालण्यात

न सांगता देखील मला हे कळाले आहे

तुझे माझ्यावर किती निस्सीम प्रेम आहे

तुला ते कधी व्यक्त करता आले नाही

मला समजून घेण्याची गरज वाटली नाही

पण आठवण झाली आज खूप दिवसांनी

पुन्हा ते दिवस परत मिळतील का परतुनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance