स्पंदन...
स्पंदन...


स्पंदन असतं आंदण जगण्याचं,
आई-बापाकडून लाभलेलं.
त्याला जपावं आसं की जसं
हिऱ्याला कोंदण सोन्याचं.
भांडण नसावं कोणाचीच,
नेहमीच सांधन असावी प्रत्येक नात्याशी.
जन्माला आलोय तर, प्रत्येक गोष्ट योग्य
त्या वेळी-योग्य त्या वयात होणारच आहे,
नको अती घाई ती मिळवण्याची
अन् नाहीच मिळाली
म्हणून,
माघार घेऊन अर्ध्यावर
नका लटकवू शरीर हे दोरावर.
माघार घेऊन टाळून
किंवा पळ काढून,
प्रश्न कधीच सुटत नसतात,
उलट आहे त्या परिस्थितीला,
तोंड देऊन, दोन हात करून,
उत्तरं मिळत असतात.
म्हणूनच, स्पंदन असतं आंदण जगण्याचं,
आई-बापाकडून लाभलेलं
ते असं हतबल होऊन संपवायचं नसतं;
तर आई- बापाच्या समाधानाचं
कारण व्हायचं असतं.