आईची संवेदना
आईची संवेदना
आईच्या गर्भाला....
वेदनेचे रुप आलं...
एका पाठोपाठ चार ही मुली...
पाचव्यांदा बाउल जन्माला आलं...
कळा सोसुन सोसुन...
वेदनेला कहर आली...
वंशाच्या दिव्यासाठी मात्र...
मनाच्या अदृश्य संवेदनेला जाग आली.....
वंशाचा दिवा म्हणुन
आनंदाने पेढे वाटले....
तोच मोठा झाल्यावर...
माय बापाला वेगळे केले...
स्वप्नांचा चुराडा, अन् दुःखाने हाल झाले....
हृदयाच्या अदृश्य संवेदनेने डोके वर काढले....
निवड करुन पत्नीला घरी आणले...
आणि त्याच पत्नीसाठी आईला झिडकारले....
आपल्या पोटचे पाच लेकरं
आई ला जड नाही वाटले...
पण ते मोठे झाल्यावर मात्र...
आईच्या भाकरीसाठी स्वतः भांडले...
कडा पानवलेल्या अदृश्य संवेदनेने
आईचे डोळे फार भरले...
