STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

व्यसनमुक्त

व्यसनमुक्त

1 min
168

आईने सौभाग्याच्या कुंकवासाठी 

केला रात्रीचा दिवस संसारासाठी 

पण बापाची दारू सुटतासुटत नव्हती

संसाराला हातभर लावायला दमडी उरत नव्हती


 बापाचा जीव दारु शिवाय राहत नव्हता

घरात येताच आईला मारहाण करत होता

लेकरांना पाहुन आई गप्प बसत होती

दिवसभर राबराबुन संसार करत होती


त्या दिवशी आईने काम लवकरच उरकलं

लोकांची भांडीधुणी करण्यासाठी निघाली 

आरशात पाहुन कपाळावर कुंकु लावलं

बाप झोपलेला पाहुन पाय कमाकडे वळविली 


आई कामावरुन झपझप पावलं टाकीत घराकडं परतली

तेव्हा गल्लीतल्या मानसांची गर्दी दारापुढ दिसली 

सगळे आईकडे पाहुन रडु लागले

आज बाप *_व्यसनमुक्त_* झाला होता कायमचा,

आणि आईचा प्रवास विरहाचा

आई म्हणाली, "अहो..तुम्हाला दारुनेच गिळलं,मला दुनियेत कुणीच नाही उरलं"

आई जळत असलेल्या बापाकडे बघत होती

अन् मी मात्र आईच्या उजाड कपाळाकडे पाहत होती...


Rate this content
Log in