मन
मन
सख्या रे....
मन असते आपल्यातील अनुभुती
मन असते आपल्या ह्दयातील कोष
मनाभोवती असतं वलय प्रेमाचं
तुझ्या माझ्यासारख्या पती- पत्नीच
मनाच मनाशी पटणारं / न पटणारं
हे अस्तित्व असतं न दिसणारं ..
पण जाणणारं... एका भावार्थातुन...
सख्या रे...
मन हे द्रवणारं असतं...
झालेल्या जखमेवर स्त्रवणारं असतं..
मनाला उमज आल्याशिवाय
वेदना जाणवत नाही...
आणि वेदनेला मनाशिवाय पुर्णत्व नाही
या पैकी एक जरी नसलं तरी...
दुःखाचा भावार्थ कळतच नाही..
मनच दाखवत असते...
नात्यातील वेदना आणि अस्तित्व
म्हणूनच तर निर्माण होतो...
मनाच्या गाभाऱ्यात त्याग आणि स्वार्थ...
