सुगरण....
सुगरण....
गवताची गोळा करूनीया काडी...
शिकावे त्या सुगरणी कडुन
गुंफायाची ही अजब कसरत
घरटे पहावे एकदा बांधुन...
सुगरणी चा खोपा झाला
फांदीला टांगलेला हँगिंग होम
लंब गोलाकार आकार कसा
कापसासारखे मऊमऊ बेडरुम
घर बांधले एकदाचे
वादळवा-यात टिकवणं महाकठीण
वादळाची चाहुल लागताच
पिल्लाचं रक्षण करिती पक्षीण
आर्किटेक्ट/इंजिनिअर ची बांधणी
बनले मानवाचे नऊ आश्चर्य
नाव त्याचा सुगरणीचा खोपा
हेच ठरले दहावे आश्चर्य...
पक्ष्यांच्या दुनियेत घर बांधणी
सुगरण म्हणजे च बिल्डर
सुगरणीच्या करामती पुढे
फिके पडलेत मानवाचे बिल्डर...
सुग्रास भोजन, गरिबीत आनंद
सुगृहीणी वरुन आली सुगरण...
गवतकाडी खोपा निर्मिती पक्षिणी
तुच तर खरी सुगरण...
