तु नाराज केलेस मला
तु नाराज केलेस मला
आज अगदी ह्रदयाचे तुकडे तुकडे झाले असं काही नाही...
वाट पहावी म्हणते... ती येईल ..
किंवा मला बोलावेल..
ती येईल पुन्हा त्याच वाटेने..
आज तिच्या असंख्य आठवणी
हिरवे ओले क्षणही आठवतात..
मन गलबलून येतं.. भरुन येतं ..
दुर क्षितीजापलिकडे धावत पळण्याचे..
तिला चिंबचिंब भिजविण्याचे दिवस ..
पण वेळ बदलली.. संदर्भ बदलले ..
तीही बदलली.. पापण्यांना पुर आले..
आता फक्त जखमा.. आठवणी...
पुन्हा कधी येईल ती???
सारा विस्कटलेला डाव..
आभार फाडायचे दिवस..
सावरले.. भ्रमिष्टा सारखी रानोमाळ फिरले..
फिर्याद मांडावीशी वाटली..
पण कधी कुणाकडे तक्रार आली नाही..
करणार ही नाही...
लिखीत असं काही नाही...
ठोस पुरावा ही नाही...
फक्त अंधा-या रात्री तिनं दिलेल्या शब्दांवर विश्वास ठेवलाय...
तिच्या प्रेमावर जगावं जन्मभर पण...
ते कदाचित जमत की नाही माहीत नाही...
स्वतःवर प्रेम करावं हे ही कळालं नाही....
अधारलेली सारखी अवस्था..माझी मीच अपराधी..
तेंव्हा रात्र- रात्र जागून काय उपयोग ...???
ती काल पर्यंत माझी होती... मात्र आज...
असं का होतं ... कसं होतं कळत नाही...
जीवाची आग शमत नाही ...
मनातील वावटळ थांबत नाही...
आताशा फक्त आठवणीवर जगत आहे...
पुढे मृत्यु आहे ..म्हणुन चालते आहे..
वेळ भयानक आहे.. याची जाण आहे...
पण कधी कधी रात्री ती माझ्यात रममाण व्हायची
यानं आता सुखावले...
मी मलाच न्याहाळतांना आठवतात तीचे ते थर
ार स्पर्श ..
प्रतिक्षेत आनंद असतो ..म्हणे...
पण किती वेळ..???
फुलांचा उत्सव संपलाय...
आता काल परवा शपथा घेऊन जगलो यार... आम्ही...
ती ही कीती नादान होती...
माझ्यासाठी रात्री जागून व्हिडीओ काॅल वर बोलायची...
पण आज ... हाती काहीच नाही...
आता सारी बंधन झुगारुन चाललेय..मी दुर कुठेतरी...
क्षितिजा पलिकडे.. हिरव्या बेटावर...
इथल्या तमाम नेत्यांनी दिल्या आहेत निरंतर जखमा...
आखीव पाऊलवाटा.... एक जीवघेणं रिंगण...
सर्वच नात्यांमधनं मुक्त होवु इच्छिते....
मध्य रात्रीची वेळ हुंदका देते...
कुणासाठी का म्हणुन रडावं ...??
कोण आपलं नि कोणं परकं होतं???
दुर क्षितिजापर्यंत तिच्या आठवणी चे दोर...
नको तेंव्हा अस्वस्थ करतात...
तिला जर समजली असती पक्ष्यांची भाषा...
आभाळाचा स्वच्छ आरसा...
तर ती झाली नसती .. दुर...
तुझ्या शब्दांवर माझा श्वास जगतोय...
तुला डोळ्यात साठवावं...
एवढी इच्छा आहे...
उभं आयुष्य घालवुन काय मिळालं???
निराशेच पिक अवेळी पदरी पडलं...
जर का जगायचे असेल सुखा समाधानाने
तर लावु नये जीव कोणाला...
कारण काटे बोचण्याचीच फक्त शक्यता असते...
आजचा पुर्ण दिवस गेला...
असाच पुढ चा पण जाईल.. कदाचित ..
अजुन काही वेगळ कारणांनी... नाही का...
माझ्या प्रत्येक क्षणात तुला शोधते...
माझी तर काय तुला आठवण येणारच नाही ...
आज आणि उद्या तर नक्कीच...
हो ना...