जात...
जात...
आठवते मला पुन्हा ते ...
आईच्या बोटाला धरुन
पहिल्या वेळेस शाळेत गेलेली
माझा प्रवेश होण्या अगोदरच
'जात' मात्र विचारलेली...
आठवते मला पुन्हा ते...
इतिहासाचे पुस्तक पाहुन
जात शब्दाचा संबंध पाहीलेला
25 कोटी लोकांनाही
जाती आधारित भेदभाव केलेला..
आठवते मला पुन्हा ते
नोकरीच्या शोधात जावुन
जागोजागी मुलाखत दिलेली
गुणवत्ता, कौशल्य पाहुन सुद्धा
जातीच्या नावाखाली...
नौकरी मात्र डावललेली....
आठवते मला पुन्हा ते
विवाह जुळवण्यापुर्वी
भावकी, सोयरे पुढे आलेले..
आपल्या जातीत बसत नाही म्हणून
लग्न मात्र मोडलेले....
आठवते मला पुन्हा ते
भारत देशाच्या पवित्र भुमित
दोन व्यक्ती मृत पावलेली
एकाला नेले कब्रस्तानात तर,
दुसऱ्याला मोक्षधामात पोहचविलेले
आठवते मला पुन्हा ते...
