STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

3  

सुमनांजली बनसोडे

Abstract Others

कोरोनाला आळा....

कोरोनाला आळा....

1 min
180

कोरोना म्हणजे काही....

हाॅस्पिटल मधे जमलेली जत्रा नव्हे...

की नदीला आलेला पूर नव्हे....

कोरोना म्हणजे ....

मानवाला मानवापासून संसर्ग 

विकसित होत जाणारा प्रवाह....

प्रवाह तो... 

मातीच्या कणाकणातुन पसरतो...

लहान-मोठ्यांना संसर्गातून जोडतो...

सामावुन घेतो...

हा तो प्रवाह जो थांबत नाही...

आणि म्हणूनच ...याला थांबवण्यासाठी 

प्रधानमंत्र्यानी घोषणा केलेली...

आम्ही मनापासून जनता कर्फ्यू स्विकारली....

दुस-यांसाठी नाही तर...

स्वतःसाठी जनता कर्फ्यू पाळला...

कोरोना व्हायरसला.....

मी व माझ्या कुटुंबाने आळा घातला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract