कदाचित आपण पुन्हा भेटू ...
कदाचित आपण पुन्हा भेटू ...
ओढ होती एकमेकांना एकमेकांची
पण मान्य नसावं नियतीला
कोणाची नजर लागली अम्हाला
आमच्या मैत्रीच्या निरपेक्ष प्रेमाला ....
खऱ्या प्रेमात मीलन नसावच
घरच्यांच्या प्रेमासाठी तो गेला
प्रेमाला हृदयात बंद केल असावचं
मी ही समजून घेतलं परिस्थितीला
जिवंत आहे अजुनही
त्याच्या एका आश्वासनावर
ह्दयातील रक्त थोपवलय खरी
जगले आहे त्याच आशेवर...
जाता जाता तो म्हणाला
कदाचित आपण पुन्हा भेटु ही
ह्याच आश्वासनावर तर मी
तग धरुन आहे अजूनही...
तो कुठे असेल, कसा असेल
अजुनही तितकीच मी आसुसलेली
त्यास बघण्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी
मनासोबत डोळेसुद्धा पाणावलेली...