STORYMIRROR

Gajanan Pote

Tragedy

3  

Gajanan Pote

Tragedy

वास्तव उन्हाळ्याचे

वास्तव उन्हाळ्याचे

1 min
279

उष्ण वारा, अंगातून वाहती घामाच्या धारा 

सूर्याचा वाढत आहे भलताच पारा।। 

अंगाची होतीया लाहीलाही 

वाटसरूला थांबण्यास सावली नाही।। 

पाणी शोधण्यास गाव भटकतो

एका एका थेंबासाठी जीव तळमळतो।। 

झाडे तोडली, जमिन सुकली

भयाण शांतता येथे पसरली।। 

स्वतः च्या स्वार्थासाठी आपण आपली कबर खोदली

निसर्गाच्या स्त्रोतांची व्यर्थ हानी केली।। 

उन्हाचा कडाका वाढतो आहे 

डोक्यावर दुष्काळ नाचत आहे 

नादान होऊन प्रत्येक जण जगतच आहे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy