वाट पाहूनी जीव शिणला...
वाट पाहूनी जीव शिणला...
सरुनी गेला जन्म सारा
अजुनी प्रतिक्षेत बहुदा
मोकळ्या नभाची छाया
ये परतुनी पुन्हा एकदा
क्षितिजास जाहल्या जखमा
कोरया अंतरीची ती दाह
अघात जिव्हारी कसला
मुक्त आसवांचा तो टाहो
तरुण वाटे रात्र काळोखी
मनास लागे छंद आगळा
वाट पाहूनी जीव शिणला
पाहटेस होता भास वेगळा

