तू आणि मी
तू आणि मी
तू असा बोलका
अन् मी अबोल
न सांगताही कळतील का तुला
माझ्या मनातले बोल
तू वादळ
मी मंद वाऱ्याची झुळूक
हळुवारपणे छेडशील का?
तार भावनांच्या नाजूक
तू दृढनिश्चय,
मी वेडी आशा
सांग, तुला उमजेल का?
माझ्या नयानाची भाषा.
मी सहनशील,
तू अधीर,
पण आता सुटला रे धीर
नयनातून वाहे नीर
