निज निज रे बाळा
निज निज रे बाळा
1 min
305
आकाशी हले चंदेरी खेळाना,
खाली झुले हातांचा पाळणा,
निज निज रे बाळा,
अंगाई गाते तुला.
अंधाराच्या कुशीत
सारी सृष्टी निजली,
आज तुझ्या डोळ्यातली,
झोप कुणी रे चोरली.
गार वारा गुदगुल्या करी,
स्पर्शून पाऊले कोवळी
पदरा आडून चंद्र हसे,
गाली दिसे मोहक खळी.
खेळ खेळून दमले,
मिटे नेत्रांची शिंपले,
माऊलीच्या कुशीत,
लेकरूही निजले.
